Rajat Bedi च्या कारने धडक बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू; पोलिसांनी दाखल केला 304 ए अंतर्गत गुन्हा

अभिनेता रजत बेदीविरोधात मुंबईतील डीएन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे

रजत बेदी (संग्रहित संपादित प्रतिमा)

अभिनेता रजत बेदीविरोधात मुंबईतील डीएन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रजत बेदी याने काल संध्याकाळी रस्त्यावर एका व्यक्तीला कारने धडक दिली. त्यानंतर रजत जखमी व्यक्तीला  कूपरला रुग्णालयात घेऊन गेला. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रजतने पीडितेच्या कुटुंबाला याबाबत माहिती दिली आणि पीडितेच्या पत्नीला मदतीचे आश्वासन दिले.

आता जखमी व्यक्तीचा काल रुग्णालयात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यानंतर, पोलिसांनी अभिनेत्याविरोधात भादंवि कलम 304 ए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.

रजत बेदीच्या कारने धडक बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement