Adipurush Teaser Release Date: प्रभू श्रीरामाच्या भूमिकेने प्रभासने जिंकली प्रेक्षकांची मनं; चित्रपटाचा टीझर कधी आणि कुठे रिलीज होणार, जाणून घ्या

आदिपुरुष हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर कधी आणि कुठे रिलीज होणार याचीही माहिती समोर आली आहे.

Adipurush Teaser Release Date (PC - Twitter)

Adipurush Teaser Release Date: दिग्दर्शक ओम राउतच्या 'आदिपुरुष' या आगामी चित्रपटासाठी व्यापारी तज्ञांपासून समीक्षक आणि प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. प्रभास, सैफ अली खान, क्रिती सॅनन आणि सनी सिंग स्टारर आदि पुरुष हा असाच एक चित्रपट आहे जो बर्याच काळापासून चर्चेत होता आणि सर्वजण त्याची आतुरतेने वाट पाहत होते. अशातचं आता प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, हा चित्रपट रिलीजच्या जवळ आला आहे. एकीकडे चित्रपटाचे टीझर पोस्टर रिलीज झाले असतानाच दुसरीकडे हा टीझर कधी आणि कुठे रिलीज होणार याचीही माहिती समोर आली आहे.

आदिपुरुष दिग्दर्शक ओम राऊत यांनी ट्विटरवर चित्रपटाच्या टीझरच्या रिलीजची घोषणा केली आणि लिहिले आहे की, "आरंभ... उत्तर प्रदेशातील अयोध्येतील सरयू नदीच्या काठावर, आमच्या जादुई प्रवासाच्या सुरुवातीचा एक भाग व्हा. चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि टीझर 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7.11 वाजता प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे."

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement