Chandu Champion First Look: कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाचे पोस्टर आऊट; अभिनेत्याचा जबरदस्त लूक पाहून सर्वच झाले थक्क
अभिनेता कार्तिक आर्यनने ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाचा पहिला पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
कार्तिक आर्यनच्या बहुचर्चित व बहुप्रतीक्षित ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच कार्तिकच्या या आगामी चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित झाला आहे. या पोस्टरमधील कार्तिक आर्यनच्या जबरदस्त लूकने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेता कार्तिक आर्यनने ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाचा पहिला पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “चॅम्पियन येत आहे. माझ्या करिअरमधील सर्वात आव्हानात्मक आणि खास चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करताना खूप उत्साही व अभिमान वाटत आहे,” असं कॅप्शन लिहित कार्तिकने ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाचा पहिला पोस्टर चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
पाहा पोस्टर -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)