Jaane Jaan Movie: करिना कपूर खानचा आगामी चित्रपट जाने जानचा पोस्टर केला शेअर, लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
अभिनेत्री करिना कपुर हीचा बहुप्रतिकक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट हा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित प्रदर्शित होणार आहे.
Jaane Jaan Movie: अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या ओटीटी डेब्यू चित्रपट 'जाने जान' च्या ट्रेलरचे रिलीज करण्यासाठी सज्ज झाली आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणारा हा चित्रपटाचा ट्रेलर 5 सप्टेंबर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे अपडेट शेअर करताना नेटफ्लिक्स इंस्टाग्रामवर लिहिले, "थ्रिल अगदी जवळ आला आहे... आणि तो 3 दिवसात तुमच्या भेटीला येत आहे! #JaaneJaan ट्रेलर. 3 दिवस बाकी." स्ट्रीमिंगने चित्रपटाचे नवीन पोस्टर देखील शेअर केले आहे ज्यामध्ये करीना वेगळ्या अवतारात दिसली आहे. या चित्रपटासाठी चाहत्यांनी खुप उत्सुकता दाखवली आहे. सोशल मीडियावर पोस्टर शेअर केला आहे. चाहत्यांनी पोस्टरवर भरपूर कंमेट देखील केले आहे. पोस्टर पाहून हा चित्रपट थ्रिलरने भररेला असा वाटतो.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 02, 2023 03:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

