Zwigato Tax free: कपिल शर्माचा ‘झ्विगाटो’ या राज्यात टॅक्स फ्री; दिग्दर्शिकेने दिली माहिती
दिग्दर्शिका नंदिता दास यांनी आपला चित्रपट टॅक्स फ्री केल्याबद्दल ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे.
कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) ‘झ्विगाटो’ या (Zwigato) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला. कपिल शर्मा आणि नंदिता दासचा (Nadita Das) हा चित्रपट ओडिशा सरकारने टॅक्स फ्री (Tax Free) केला आहे. ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री नविन पटनायक (Naveen Patnaik) यांनी याबाबतची घोषणा केली आहे. ‘झ्विगाटो’ हा चित्रपट पुर्णपणे ओडिशातील भुवनेश्वर या ठिकाणी चित्रीत केला आहे. दिग्दर्शिका नंदिता दास यांनी आपला चित्रपट टॅक्स फ्री केल्याबद्दल ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे.
पहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)