Kanwar Yatra 2024: कावड यात्रेपूर्वी यूपी सरकारच्या वादग्रस्त आदेशावर Sonu Sood ची प्रतिक्रिया, म्हणाला- 'प्रत्येक दुकानावर एकच नेमप्लेट असावी... मानवता!'

सीएम योगी यांनी आदेश दिले आहेत की संपूर्ण यूपीमधील कावड यात्रा मार्गावरील खाद्यपदार्थांच्या दुकानांवर ऑपरेटर, मालकाचे नाव, त्यांची ओळख लिहिणे बंधनकारक असेल.

Sonu Sood

Kanwar Yatra 2024: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. अनेक मुद्द्यांवर सोनूने न घाबरता आपले विचार मांडले आहेत. आता कावड यात्रेसंदर्भात युपी सरकारने लागू केलेल्या नियमाबाबत सोनूने भाष्य केले आहे. नुकतेच यूपी सरकारने 22 जुलैपासून सुरू होणाऱ्या कावड यात्रा मार्गावरील दुकानदारांना आदेश जारी केला आहे, त्यानुसार या दुकानदारांना दुकानावर आपल्या नावाचा बोर्ड लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. यावर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. अशात सोनू सूदने याबाबत केलेली पोस्ट चर्चेत आहे. एक्सवर पोस्ट शेअर करताना सोनू सूदने लिहिले की, 'प्रत्येक दुकानावारे एकच नेम प्लेट असावी आणि ती म्हणजे मानवता'. सोनू सूदच्या या पोस्टला चाहते पसंती देत असून, त्याच्या विचारसरणीचे खूप कौतुक करत आहेत.

दरम्यान, सीएम योगी यांनी आदेश दिले आहेत की संपूर्ण यूपीमधील कावड यात्रा  मार्गावरील खाद्यपदार्थांच्या दुकानांवर ऑपरेटर, मालकाचे नाव, त्यांची ओळख लिहिणे बंधनकारक असेल. कावड यात्रेकरूंच्या श्रद्धेची शुद्धता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय कावड यात्रा मार्गावर हलाल प्रमाणपत्रासह उत्पादने विकणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. (हेही वाचा: Muslim Marriages Law Abolished in Assam: आसाम सरकारचा मोठा निर्णय! मुस्लिम विवाह कायदा रद्द; मुख्यमंत्री हिमंता विश्व शर्मा यांनी 'X'वर दिली माहिती)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Kailash Mansarovar Yatra 2025: कैलास मानसरोवर यात्रा पाच वर्षांच्या खंडानंतर जून 2025 पासून पुन्हा सुरू; जाणून घ्या तपशील, कुठे कराल अर्ज व महत्त्व

Pahalgam Terror Attack: 'राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी सैन्याच्या हालचालींचे थेट प्रक्षेपण दाखवू नये'; भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मीडिया चॅनेल्ससाठी जारी केली अ‍ॅडव्हायझरी

Pahalgam Terror Attack: कश्मीर मध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकार कडून विशेष विमानाची सोय; 6 मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर

Charity Hospitals: धर्मादाय रुग्णालयांनी आगाऊ पैसे न घेता आपत्कालीन रुग्णांना दाखल करून घ्यावे; महाराष्ट्र सरकारचे निर्देश

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement