Lok Sabha Elections Result 2024: निकालापुर्वी कंगना रणौतने तिच्या निवासस्थानी केली प्रार्थना, मोठ्या फरकाने आघाडीवर (Watch Video)

सकाळी 8 वाजल्यापासुन मतमोजनीला सुरुवात झाली आहे. एकीकडे एनडीएचे नरेंद्र मोदी हे तिसऱ्या टर्मसाठी प्रयत्नशील असून दुसरीकडे इंडिया आघाडी मोदींचा हा वारू रोखण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मोदींची हॅट्रिक की इंडिया आघाडीची जादू, देशात चलती कुणाची याच्या महानिकालाकडे सर्वांचं लक्ष आहे.

Lok Sabha Elections Result 2024: अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा अवघ्या काहीच तासांत लागणार असून देशात सत्ता कुणाची याचा फैसला (Lok Sabha Election Result 2024 ) होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासुन मतमोजनीला सुरुवात झाली आहे. एकीकडे एनडीएचे नरेंद्र मोदी हे तिसऱ्या टर्मसाठी प्रयत्नशील असून दुसरीकडे इंडिया आघाडी मोदींचा हा वारू रोखण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मोदींची हॅट्रिक की इंडिया आघाडीची जादू, देशात चलती कुणाची याच्या महानिकालाकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेश येथील मंडीतील भाजप उमेदवार आणि अभिनेत्री कंगना रणौत तिच्या निवासस्थानी प्रार्थना करत आहे. ताज्या ECI ट्रेंडनुसार, कंगना 30,254 मतांच्या फरकाने आघाडीवर आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement