'मी Kangana Ranaut ला धमकावले नाही, तर तिला Hrithik Roshan सोबतचे मुद्दे सौहार्दपूर्णपणे सोडवण्याची सूचना केली'; Javed Akhtar यांची कोर्टात माहिती
कंगना रनौतने 2016 मध्ये हृतिक रोशनसोबतच्या तिच्या सार्वजनिक भांडणात अख्तर यांच्यावर खंडणी व गुन्हेगारी धमकावल्याचा आरोप केला आहे.
गीतकार जावेद अख्तर यांनी नुकतेच अभिनेत्री कंगना राणौतसोबतच्या न्यायालयीन प्रकरणाबाबत मुंबई न्यायालयासमोर साक्ष दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, त्यांनी अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना राणौत यांच्यातील वाद सौहार्दपूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न केला. हृतिक रोशनशी झालेल्या भांडणात कंगनाने केलेल्या खंडणीच्या आरोपाला उत्तर देताना अख्तर यांनी हे विधान केले आहे. कंगना रनौतने 2016 मध्ये हृतिक रोशनसोबतच्या तिच्या सार्वजनिक भांडणात अख्तर यांच्यावर खंडणी व गुन्हेगारी धमकावल्याचा आरोप केला आहे. (हेही वाचा: राखी सावंतचा भाऊ Rakesh Sawant याला मुंबई पोलिसांकडून अटक, जाणून घ्या काय आहे गुन्हा)
अख्तर म्हणाले, 'मार्च 2016 मध्ये, एके दिवशी रमेश अग्रवाल आरोपी कंगना राणौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल सोबत संध्याकाळी 7.00-7.30 च्या सुमारास मला भेटण्यासाठी जुहू येथे माझ्या घरी आले. त्या वेळी मी तिला स्वतःच्या आणि हृतिक रोशनमधील वादाबद्दल समजावण्याचा प्रयत्न केला. मी तिला म्हणालो की तुम्ही दोघेही सेलिब्रिटी आहात आणि अशा प्रकारच्या वादाचा तुमच्या करिअरवर परिणाम होईल. मी तिला सर्वकाही विसरून हृतिक रोशनशी चांगले संबंध ठेवण्यास सांगितले. कंगना राणौतला मी धमकावले नाही तर तिला हृतिक रोशनसोबतचे मुद्दे सौहार्दपूर्णपणे सोडवण्याची सूचना केली.'
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)