Honey Singh Divorce: रॅपर हनी सिंग आणि शालिनीचा घटस्फोट, न्यायालयाने दिली मंजुरी; 12 वर्षांचे नाते आले संपुष्टात

सर्व वाद संपवण्यासाठी, दोघांमध्ये एक करार झाला, त्यानंतर दोन्ही पक्षांना घटस्फोट मंजूर केला गेला. या करारानंतर हनी सिंगच्या पत्नीने घरगुती हिंसाचाराचा खटला मागे घेतला आहे.

Honey Singh (Photo Credit - Twitter)

प्रसिद्ध रॅपर हनी सिंग त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हनी सिंग आणि त्याची पत्नी शालिनी 12 वर्षांनंतर एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. दिल्लीतील एका न्यायालयाने मंगळवारी दोघांचा घटस्फोट मंजूर केला आहे. गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेले न्यायालयीन प्रकरण संपुष्टात आणत घटस्फोटाला मंजुरी मिळाल्याचे वृत्त आहे. हनी सिंगवर त्याची पत्नी शालिनी तलवार हिने कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. सर्व वाद संपवण्यासाठी, दोघांमध्ये एक करार झाला, त्यानंतर दोन्ही पक्षांना घटस्फोट मंजूर केला गेला. या करारानंतर हनी सिंगच्या पत्नीने घरगुती हिंसाचाराचा खटला मागे घेतला आहे. हनी सिंग आणि शालिनी तलवार हे एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. दोघेही शाळेपासून एकमेकांना डेट करत होते. बराच काळ डेटिंग केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला व 2011 मध्ये दोघांनी गुरुद्वारामध्ये लग्न केले. (हेही वाचा: Deepfake Row: डीपफेक व्हिडिओबाबत सरकारचे कठोर पाऊल; दोषी आढळल्यास होऊ शकतो तीन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now