Hamare Baarah: उच्च न्यायालयाने पाहिला ‘हमारे बारह’ चित्रपट; काहीही आक्षेपार्ह नसल्याची माहिती, सामाजिक संदेश देत असल्याची टिपण्णी
खंडपीठाने सांगितले की, चित्रपटाचा पहिला ट्रेलर आक्षेपार्ह होता, मात्र तो काढून टाकण्यात आला आहे आणि अशी सर्व आक्षेपार्ह दृश्ये चित्रपटातून काढून टाकण्यात आली आहेत.
‘हमारे बारह’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. चित्रपटाचा टीझर इस्लामिक श्रद्धा आणि विवाहित मुस्लिम महिलांचा अपमान करत असल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला होता. याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने नमूद केले की, आम्ही चित्रपट पाहिला असून चित्रपटात आक्षेपार्ह काहीही नाही, काही आक्षेपार्ह शब्द आणि दृश्ये काढून टाकण्यात आली आहे. चित्रपटाचा ट्रेलर किंवा टीझर पाहून चित्रपट कसा असेल याचा अंदाज लावता येत नाही. चित्रपट न पाहता टिप्पणी करणे चुकीचे असल्याचेही न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या वकिलाला सांगितले.
न्यायमूर्ती बीपी कुलाबावाला आणि फिरदौस पूनीवाला यांच्या खंडपीठाने सांगितले की, चित्रपटाचा पहिला ट्रेलर आक्षेपार्ह होता, मात्र तो काढून टाकण्यात आला आहे आणि अशी सर्व आक्षेपार्ह दृश्ये चित्रपटातून काढून टाकण्यात आली आहेत. हा चित्रपट एक सामाजिक असून, तो खरोखरच विचार करायला लावणारा चित्रपट आहे. समाजाला सामाजिक संदेश देण्यासाठी हा चित्रपट बनवण्यात आला आहे. (हेही वाचा: JNU Jahangir National University Trailer: 'जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी'चा वादग्रस्त ट्रेलर रिलीज; सिद्धार्थ बोडके प्रमुख भूमिकेत)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)