Ask SRK Session: "मी माझ्या 4 बायकांना 24 मुलांना डंकी बघू देणार नाही!"; नेटकऱ्याच्या अतरंगी प्रश्नाला शाहरुखचं मजेशीर उत्तर

शाहरुख खान हा सध्या त्याच्या 'डंकी' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Shah Rukh Khan (PC - Facebook)

शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा सध्या त्याच्या 'डंकी' (Dunki) या आगामी  चित्रपटामुळे चर्चेत आहे.  नुकतेच शाहरुखनं ट्विटरवर आस्क एसआरके हे सेशन केलं.यावेळी "शाहरुख, लव्ह मी बॅक, नाही तर मी माझ्या 4 बायकांना, 24 मुलांना आणि 50 शेजाऱ्यांना डंकी बघू देणार नाही! तू एवढं नुकसान झेलू शकणार नाहीस"  असे एका यूझर्सने म्हटले. यावर  शाहरुख खाननेही मजेशीर उत्तर दिले. शाहरुखने आपल्या ट्विटमध्ये लिहले की "तू तसंही एवढा बिझी असशील, अजून काम करायला वेळ कसा काढणार? प्लिज तू मुलांसोबत आणि पत्नींसोबत वेळ घालव. मुलांसोबत खेळ आणि बायकांना चित्रपटासाठी घेऊन जा." (हेही वाचा - Kapil Sharma And Sunil Grover: कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर पुन्हा दिसणार एकत्र; विनोदी व्हिडिओ केला शेअर)

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)