Gururaj Jois Dies: सिनेमॅटोग्राफर गुरुराज जोइस यांचे वयाच्या 53 व्या वर्षी निधन; Mission Istanbul, Zanjeer सारख्या चित्रपटांमध्ये केले होते काम
सिनेमॅटोग्राफर अनिल मेहता यांचा सहाय्यक म्हणून चित्रपटसृष्टीतील गुरुराज यांचा प्रवास 'लगान'च्या निर्मितीदरम्यान सुरू झाला.
- Read in
- मराठी
कॅमेरामन गुरुराज जोइस यांचे काल (27 नोव्हेंबर) सकाळी बंगळुरू येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 53 वर्षांचे होते आणि त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मूल आहे. गुरुराज यांनी अपूर्व लखिया यांनी बनवलेल्या बहुतेक चित्रपटांचे छायांकन केले होते. गुरुराज आणि अपूर्व यांची भेट लगानच्या सेटवर झाली, तेव्हा गुरुराज सिनेमॅटोग्राफर अनिल मेहता यांचे सहाय्यक होते, तर अपूर्वने दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना सहाय्य केले होते. गुरुराज यांनी ‘मुंबई से आया मेरा दोस्त’, ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’, ‘मिशन इस्तंबूल’, ‘एक अजनबी’, ‘जंजीर’, ‘गली गली चोर है’ अशा अनेक चित्रपटांचे छायांकन केले होते. सिनेमॅटोग्राफर अनिल मेहता यांचा सहाय्यक म्हणून चित्रपटसृष्टीतील गुरुराज यांचा प्रवास 'लगान'च्या निर्मितीदरम्यान सुरू झाला. आमिर खान प्रॉडक्शनने गुरूराज जोईस यांच्या निधनाबाबत तीव्र दु:ख आणि शोक व्यक्त केला आहे. (हेही वाचा: Famous Designer On Ventilator: सेलिब्रिटी फॅशन डिझायनर रोहित बाल यांची प्रकृती चिंताजनक, दिल्लीच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु - रिपोर्ट्स)
Deeply saddened to hear about the loss of Gururaj Jois.
One of the many passionate souls on that desert whose work behind the camera brought Lagaan to life 🙏 May your soul rest in peace 🕊️ pic.twitter.com/W4zDymclpF
— Aamir Khan Productions (@AKPPL_Official) November 28, 2023
#GururajJoisDies at 53; Cinematographer Had Worked in Bollywood Films Like #MissionIstanbul, #Zanjeer Among Others
#GururajJois #GururajJoisDeath #EntertainmentNews https://t.co/gCOhAeSSb0
— LatestLY (@latestly) November 28, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 28, 2023 04:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

