Gulabi: Huma Qureshiने अहमदाबादमध्ये 'गुलाबी'चे शूटिंग केले सुरू, विपुल मेहता करणार चित्रपटाचे दिग्दर्शन
हुमा कुरेशीने आज अहमदाबादमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
हुमा कुरेशीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एक खास घोषणा केली असून, तिने तिच्या आगामी 'गुलाबी' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. हा चित्रपट जिओ स्टुडिओच्या बॅनरखाली बनवला जाणार आहे. हुमा कुरेशीने आज अहमदाबादमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. विपुल मेहता दिग्दर्शित आणि विशाल राणा सोबत ज्योती देशपांडे निर्मित, 'गुलाबी' हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा चित्रपट ठरेल, अशी माहिती अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांशी शेअर केली आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)