Gehraiyaan Trailer: दीपिका पादुकोनच्या ओटीटीवरचा पहिला वहिला चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज, ट्रेलर प्रदर्शित
भारतातील तसेच जगातील 240 देशांतील दर्शकांना Amazon Prime Video वर या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे.
दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Shiddhant Chaturvedi) स्टारर चित्रपट गहराईयानचा (Gehraiyaan) ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये चार प्रमुख व्यक्तिरेखा आहेत. ज्यांचे आयुष्य एकमेकांत गुंतलेले आहे. दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य करवा व्यतिरिक्त या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 11 फेब्रुवारी 2022 रोजी या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. भारतातील तसेच जगातील 240 देशांतील दर्शकांना Amazon Prime Video वर या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)