Ganeshotsav 2021: अभिनेत्री Shilpa Shetty च्या घरी गणपती बाप्पांचे आगमन, यंदा एकटीनेच मूर्ती आणली घरी (Watch Video)
बॉलिवूड अभिनेत्री आणि 'सुपर डान्सर 4' ची जज शिल्पा शेट्टीच्या जीवनात गेल्या काही दिवसांपासून विघ्नांची मालिका सुरु आहे. पती राज कुंद्राला अश्लील व्हिडिओ निर्मिती प्रकरणात अटक झाल्यानंतर तिला अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे
बॉलिवूड अभिनेत्री आणि 'सुपर डान्सर 4' ची जज शिल्पा शेट्टीच्या जीवनात गेल्या काही दिवसांपासून विघ्नांची मालिका सुरु आहे. पती राज कुंद्राला अश्लील व्हिडिओ निर्मिती प्रकरणात अटक झाल्यानंतर तिला अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. परंतु तिचा देवावरील विश्वास अजिबात कमी झालेला नाही. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने शिल्पाच्या घरी दरवर्षी 'गणपती बाप्पा'चे आगमन होते व आता यंदाही शिल्पाने बाप्पाला घरी आणले आहे. मात्र, यंदा पती राज कुंद्रा आणि बहीण शमिता शेट्टी तिच्यासोबत नव्हते.
राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात तुरुंगात आहे, तर बहीण शमिता बिग बॉस ओटीटीमध्ये दिसत आहे. गणेश चतुर्थी 10 सप्टेंबर रोजी आहे. शिल्पा शेट्टीने त्याआधीच बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू केली होती. आता नुकतेच तिने लालबाग वर्कशॉपमधून बाप्पाची मूर्ती आपल्या घरी आणली आहे. सध्या याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
शिल्पा शेट्टीच्या घरी गणपतीचे आगमन -
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 08, 2021 04:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

