Viral Video: हैदराबादमध्ये आदिपुरुष चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान थिएटरमध्ये भगवान हनुमानाच्या आरक्षित आसनावर बसलेल्या व्यक्तीला मारहाण

जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मोठ्या संख्येने चाहत्यांच्या गर्दीसह स्क्रीनिंग होत असताना, भगवान हनुमानासाठी राखीव असलेल्या आसनावर बसल्याने एका व्यक्तीवर हल्ला करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video: हैदराबादमध्ये आदिपुरुष चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान थिएटरमध्ये भगवान हनुमानाच्या आरक्षित आसनावर बसलेल्या व्यक्तीला मारहाण
भगवान हनुमानाच्या आरक्षित आसनावर बसलेल्या व्यक्तीला मारहाण (PC - Twitter)

Viral Video: आज प्रभासचा बहुप्रतिक्षीत आदिपुरुष चित्रपट रिलीज झाला. चित्रपटगृह मालकांनी चित्रपट निर्माते ओम राऊत यांच्या विनंतीनुसार, चित्रपटगृहातील एक सीट भगवान हनुमानासाठी राखीव ठेवलं. जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मोठ्या संख्येने चाहत्यांच्या गर्दीसह स्क्रीनिंग होत असताना, भगवान हनुमानासाठी राखीव असलेल्या आसनावर बसल्याने एका व्यक्तीवर हल्ला करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका ट्विटर युजरने ही घटना तेलंगणातील हैदराबाद येथील भ्रामरांबा थिएटरमध्ये घडल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा - Adipurush: प्रभास स्टारर आदिपुरुष चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज; दिल्ली, मुंबईत 2,000 रुपयांना विकले जात आहे एक तिकीट- Reports)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 16, 2023 12:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).