Ranbir Kapoor in Dhoom 4: धूम 4'मध्ये रणबीर कपूरची धमाकेदार एन्ट्री, खतरनाक खलनायकाची भूमिका साकरणार

बॉलिवूडची सर्वात मोठी अॅक्श फिल्म फ्रॅंचायझी धूम चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. बहुप्रतिक्षित धूम ४ चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर मुख्य भुमिकेत झळकणार आहे. २००४ मध्ये आदित्य चोप्राने जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा यांच्यासोबत धूम बनवला होता.

Ranbir Kapoor in Dhoom 4: धूम 4'मध्ये रणबीर कपूरची धमाकेदार एन्ट्री, खतरनाक खलनायकाची भूमिका साकरणार
Ranbir Kapoor

Ranbir Kapoor in Dhoom 4: बॉलिवूडची सर्वात मोठी अॅक्श फिल्म फ्रॅंचायझी धूम चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. बहुप्रतिक्षित 'धूम 4' चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर मुख्य भुमिकेत झळकणार आहे. 2004 मध्ये आदित्य चोप्राने जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा यांच्यासोबत धूम बनवला होता. त्यानंतर 2006 मध्ये ह्रतिक रोशन आणि त्यानंतर 2013 मध्ये आमिर खान यांची चित्रपटात एन्ट्री झाली. आता या धुमच्या चौथ्या भागात रणबीर कपूर खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. अभिनेता रणबीर कपूर नकारात्मक भुमिकेत कास्ट करणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात आधीच्या चित्रपटांतील एकही प्रमुख कलाकार यावेळी दिसणार नाही. या चित्रपटात दोन नवीन तरुण सुपरस्टार पोलीसाच्या भूमिकेत दिसणार आहेत. (हेही वाचा- श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री 2'ची हवा कायम; 'आयी नई' गाण्यावर कॅन्डिड डान्स )

धूम 4 मध्ये रणबीर कपूरची एन्ट्री

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 28, 2024 01:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).