Jacqueline Fernandez: दिल्ली पोलीस जॅकलिन फर्नांडिसची 19 सप्टेंबरला पुन्हा चौकशी करणार, हजर राहण्याचे निर्देश

सुकेश चंद्रशेखर सध्या तिहार तुरुंगात आहे. त्याच्यावर प्रभावशाली लोकांसह अनेकांना फसवल्याचा आरोप आहे.

Jacqueline Fernandez (Photo Credit - Twitter)

दिल्ली पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) सुकेश चंद्रशेखरच्या कथित खंडणी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी सोमवारी, 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता आर्थिक गुन्हे शाखेसमोर (EOW) हजर होण्यासाठी समन्स बजावले आहे. या संदर्भात बुधवारी श्रीलंकेची नागरिक असलेली जॅकलिनही ईओडब्ल्यूसमोर हजर झाली होती. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पिंकी इराणी जॅकलिनसोबत होती. इराणी यांनीच जॅकलिनची सुकेश चंद्रशेखरशी ओळख करून दिली होती. त्यावेळी जॅकलीनची तबब्ल आठ तास चौकशी सुरू होती. ईडीने जॅकलीनचा जबाब नोंदवून घेतला होता. त्यावेळीच जॅकलीनला पुन्हा चौकशीसाठी बोलवलं जाऊ शकतं, अशी शक्यता वर्तवली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement