Chhaava Advance Booking: विकी कौशलचा ऐतिहासिक चित्रपट 'छावा' उद्या प्रदर्शनासाठी सज्ज; आगाऊ बुकिंगने ओलांडला 10 कोटींचा टप्पा
'छावा' हा चित्रपट व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना अभिनीत हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांची कथा सांगतो.
विकी कौशलचा ऐतिहासिक चित्रपट 'छावा' हा 2025 मधील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाच्या स्टारकास्टने प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडली नाही, त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याची बरीच चर्चा सुरू झाली आहे. आता हा चित्रपट पहिल्या दिवशी पाहण्यासाठी लोकांमध्ये स्पर्धा सुरू आहे आणि त्याचे अॅडव्हान्स बुकिंग जोरात सुरू आहे. रिलीजपूर्वी चित्रपटाने प्री-तिकीट विक्रीत कोट्यावधी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने आगाऊ बुकिंगमध्ये 10 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. 'छावा' हा चित्रपट व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना अभिनीत हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांची कथा सांगतो. ट्रेलर आणि पोस्टर्समुळे या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
Sacnilk.com च्या सुरुवातीच्या अंदाजानुसार, 'छावा'ने केवळ आगाऊ तिकिट विक्रीतून अंदाजे 8.88 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाने देशभरात 11,133 हून अधिक शोसाठी 3.18 लाखांहून अधिक तिकिटे विकली आहेत. कमाईचा एक मोठा भाग- 8.48 कोटी रुपये हा हिंदी 2डी फॉरमॅटमधून आला आहे. याव्यतिरिक्त, आयमॅक्स 2डी आवृत्तीने 29.41 लाख रुपयांचे योगदान दिले आहे, तर आयसीई आणि 4डीएक्स आवृत्तीने एकत्रितपणे 10 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. आज रात्रीपर्यंत याचे अॅडव्हान्स बुकिंग आणखी वाढेल, अशी अपेक्षा आहे. सध्याचा आकडा 8.88 कोटी रुपये असला तरी, ब्लॉक केलेल्या जागांचा समावेश केल्याने चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईपर्यंत एकूण कमी 10.82 कोटी रुपये होण्याची अपेक्षा आहे. (हेही वाचा; Vicky Kaushalआणि Rashmika Mandanna 'छावा' च्या प्रदर्शनापूर्वी पोहचले शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला)
Chhaava Advance Booking:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)