चित्रपट निर्माते Kamal Kishor Mishra विरोधात गुन्हा दाखल; पत्नीला कारने धडक दिल्याचा आरोप (Watch Video)

पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Kamal Kishor Mishra (संग्रहित संपादित प्रतिमा)

चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा यांच्याविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आंबोली पोलिसांनी मिश्राविरुद्ध भादंवि कलम 279 आणि 338 अन्वये गुन्हा दाखल करून याबाबतचा तपास सुरु आहे. कमल किशोर मिश्रा यांच्यावर पत्नीला कारने धडक दिल्याचा आरोप आहे. कमलने 19 ऑक्टोबर रोजी पत्नीला कारने धडक दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात मिश्रा यांची पत्नी यास्मिन गंभीर जखमी झाली आहे. पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. अद्याप याप्रकरणी कमल किशोर यांचे कोणतेही वक्तव्य समोर आलेले नाही. कमल वन एंटरटेनमेंट फिल्म प्रोडक्शन नावाचे प्रोडक्शन हाऊस चालवतात.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement