Raksha Bandhan Trailer: भाऊ आणि बहिणीचं सुंदर नातं उलगडणार, 'रक्षा बंधन'चा ट्रेलर प्रदर्शित
चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'रक्षा बंधन'चा ट्रेलर (Raksha Bandhan Trailer) रिलीज केला आहे.
सध्या बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे (Akshay Kumar) सर्व लक्ष त्याच्या आगामी 'रक्षा बंधन' या चित्रपटावर आहे, ज्याशी संबंधित प्रत्येक माहिती अभिनेता सोशल मीडियावर शेअर करत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'रक्षा बंधन'चा ट्रेलर (Raksha Bandhan Trailer) रिलीज केला आहे. हा चित्रपट भाऊ आणि बहिणीच्या एका सुंदर नात्यावर आधारित आहे, ज्यामध्ये प्रेमासोबतच खूप धमालही पाहायला मिळणार आहे आणि याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. अक्षय कुमारचा 'रक्षाबंधन' हा सिनेमा 11 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. काही काळापूर्वी अभिनेत्याने त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. त्याचबरोबर आमिर खान आणि करीना कपूर खान यांचा बहुप्रतिक्षित 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपटही याच दिवशी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)