Anupam Kher's Office Robbed: अभिनेता अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी; लेखा विभागाची तिजोरी आणि चित्रपटाचा निगेटिव्ह बॉक्स चोरट्यांनी काढला पळ

अनुपम खेर यांच्या मुंबईतील कार्यालयात चोरी झाली आहे. कार्यालयातील लेखा विभागातील तिजोरी घेऊन चोरट्यांनी पलायन केले. एका चित्रपटाचा निगेटिव्ह बॉक्सही त्यांनी सोबत नेला आहे.

Anupam Kher

Anupam Kher's Office Robbed: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या मुंबईतील कार्यालयात चोरी झाली आहे. कार्यालयातील लेखा विभागातील तिजोरी घेऊन चोरट्यांनी पलायन केले. एका चित्रपटाचा निगेटिव्ह बॉक्सही त्यांनी सोबत नेला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे ऑटोमध्ये बसताना दिसत आहेत. याप्रकरणी अनुपम खेर यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अनुपम खेर यांनी X वर एक पोस्ट लिहून याबाबत माहिती दिली.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'माझ्या वीरा देसाई रोडच्या ऑफिसमध्ये काल रात्री (बुधवार) दोन चोरट्यांनी माझ्या ऑफिसचे दोन दरवाजे तोडले आणि अकाउंट्स डिपार्टमेंटमधील संपूर्ण तिजोरी (जो कदाचित ते फोडू शकले नाहीत) आणि एका चित्रपटाचा निगेटिव्ह बॉक्स घेऊन गेले. आमच्या कार्यालयाने एफआयआर दाखल केला आहे आणि पोलिसांनी आश्वासन दिले आहे की चोर लवकरच पकडले जातील. ईश्वर या चोरांना सद्बुद्धी देवो!’ (हेही वाचा: Abhishek Bachchan ला घरपोच मिळाली 'जगातली सर्वोत्तम मिसळ'; Swiggy साठी शेअर केली खास पोस्ट)

पहा पोस्ट- 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement