Anant – Radhika Wedding: पंतप्रधान नरेंद्र मोदींची अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद कार्यक्रमात हजेरी; मुकेश अंबानींकडून स्वागत
स्वतःच्या जागेवर जाण्यापूर्वी त्यांनी सर्वांशी हस्तांदोलन केले. नववधू आणि नववराने नरेंद्र मोदी यांचे वाकून आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्याबरोबर मुकेश अंबानी यांनी त्यांची सोबत केली.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या लेकाचा म्हणजेच अनंत अंबानीचा शाही विवाह सोहळा मुंबईत 12 जुलै रोजी पार पडला. आज मुंबईच्या जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये शुभ आशीर्वाद सोहळा आहे. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या सोहळ्यात (Anant – Radhika Wedding) आज उपस्थिती लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रम स्थळी हजेरी लावताच सर्वांनी उभे राहून त्यांचं स्वागत केलं. तसंच, स्वतःच्या जागेवर जाण्यापूर्वी त्यांनी सर्वांशी हस्तांदोलन केले. नववधू आणि नववराने नरेंद्र मोदी यांचे वाकून आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्याबरोबर मुकेश अंबानी यांनी त्यांची सोबत केली.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)