Alcohol Ban: 'सर्व राज्यांमध्ये दारूबंदी करा, मी आयुष्यात दारूवर गाणार नाही'; Diljit Dosanjh चे तेलंगणा सरकारला उत्तर (Video)

दिलजीत म्हणतो, जर आपल्याकडील सर्व राज्ये ड्राय स्टेट म्हणून घोषित केली, तर दुसऱ्या दिवसापासून मी दारूवर गाणे आणि लिहिणे बंद करेन.

Diljit Dosanjh फोटो सोजन्य - इन्स्टाग्राम)

पंजाबी गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ सध्या चर्चेत आहे. परदेशात मैफिली करून तो रसिकांची मने जिंकत होता. यावेळी दिलजीत भारतात एक कॉन्सर्ट करत आहे, ज्याचे नाव आहे 'दिल लुमिनाटी'. अनेक राज्यांत तो हा शो करत आहे. 15 नोव्हेंबरला हैदराबादमध्ये दिलजीतचा कॉन्सर्ट होता. यासंदर्भात तेलंगणा सरकारने कार्यक्रमाच्या आयोजकांना नोटीस पाठवली होती. तेलंगणा सरकारने दिलजीत दोसांझला नोटीस बजावली आणि त्याच्या कॉन्सर्टमध्ये अल्कोहोल, हिंसा आणि ड्रग्ज असलेली गाणी न गाण्याची सूचना केली. आता याप्रकरणी दिलजीत दोसांझने आपले उत्तर दिले आहे. दिलजीत म्हणतो, जर आपल्याकडील सर्व राज्ये ड्राय स्टेट म्हणून घोषित केली, तर दुसऱ्या दिवसापासून मी दारूवर गाणे आणि लिहिणे बंद करेन.

टीम दिलजीत नावाच्या इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये गायक दिलजीत दोसांझ म्हणतो, 'जेव्हा इतर देशांतील कलाकार इथे येतात तेव्हा त्यांना हवे ते करण्याची परवानगी मिळते. त्याच वेळी, जेव्हा आपल्याच देशातील कलाकार गातो तेव्हा एक समस्या उद्भवते. जर आपण सर्व राज्ये ड्राय स्टेट म्हणून घोषित केली तर दुसऱ्याच दिवशी दिलजीत दोसांझ आपल्या आयुष्यात दारूवर गाणे गात नाही.’ (हेही वाचा: Diljit Dosanjh Gets Notice: हैदराबाद कॉन्सर्टच्या आधी दिलजीत दोसांझला नोटीस; 'ही' गाणी गाण्यास बंदी, काय आहे नेमकं प्रकरण? वाचा)

दिलजीत दोसांझचे तेलंगणा सरकारला उत्तर-

 

View this post on Instagram

 

A post shared by DILJIT DOSANJH (@diljitdosanjh)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif