Adipurush Controversy: 'कोणालाही कोणाच्याही भावना दुखावण्याचा अधिकार नाही'; आदिपुरुष वादावर Minister Anurag Thakur यांची प्रतिक्रिया (Watch)
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (CBFC) यावर निर्णय घेतला आहे. निर्माता चित्रपटाचे संवाद बदलण्यास तयार असल्याच्या बातम्या समोर आल्याचेही ठाकूर म्हणाले. 'आदिपुरुष'च्या संवादांमुळे संतप्त झालेल्या अयोध्येतील संतांनी त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' चित्रपटावर सडकून टीका होत आहे. चित्रपटातील संवाद, रामायणाचे चित्रण, वेशभूषा, पात्रे अशा अनेक गोष्टींना नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. चित्रपटात रामायणातील पात्रांचा अनादर करण्यात आला असून धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे बोलले जात आहे. अशा स्थितीत आता सरकारनेही याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे ठरवले आहे. आदिपुरुष'वरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार कोणालाही देता येणार नाही, असे म्हटले आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (CBFC) यावर निर्णय घेतला आहे. निर्माता चित्रपटाचे संवाद बदलण्यास तयार असल्याच्या बातम्या समोर आल्याचेही ठाकूर म्हणाले. 'आदिपुरुष'च्या संवादांमुळे संतप्त झालेल्या अयोध्येतील संतांनी त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. (हेही वाचा: Adipurush Controversy: जम्मूत आदिपुरुष विरोधात आंदोलन, चित्रपटावर बंदी टाकण्याची मागणी)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)