अभिनेत्री Shilpa Shetty आणि पती Raj Kundra यांनी Sherlyn Chopra विरोधात दाखल केला 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा

शर्लिन चोप्राने अलीकडेच राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याविरोधात लैंगिक छळ, फसवणूक आणि गुन्हेगारी धमकी दिल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत.

Sherlyn Chopra and Raj Kundra (संग्रहित संपादित प्रतिमा)

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा आणि राज कुंद्रा यांनी प्लेबॉय फेम अभिनेत्री शर्लिन चोप्रावर 50 कोटींचा दावा दाखल केला आहे. या बॉलिवूड पॉवर कपलने शर्लिन चोप्राविरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे. शिल्पा आणि राज यांनी अनेक वेळा इशारा दिल्यानंतर ही कारवाई केली आहे. याआधी शिल्पा आणि राजचे वकील म्हणाले होते, 'शर्लिन चोप्रा मीडियामध्ये जे काही वक्तव्य करत आहे, ते कायदेशीर चौकटीत असले पाहिजे. शर्लिन चोप्राने अलीकडेच राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याविरोधात लैंगिक छळ, फसवणूक आणि गुन्हेगारी धमकी दिल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)