'बचपन का प्यार' फेम Sahdev Dirdo चा अपघात; डोक्याला जखम, उपचार सुरु
'बचपन का प्यार' फेम सहदेव दिरदोचा मंगळवारी सायंकाळी अपघात झाला.
'बचपन का प्यार' फेम सहदेव दिरदोचा मंगळवारी सायंकाळी अपघात झाला. स्कूटीवर ट्रिपल सीट जाणे त्याला महागात पडले. या अपघातात सहदेवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. छत्तीसगडच्या सुकमा जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर सहदेवला चांगल्या उपचारासाठी जगदलपूरला रेफर करण्यात आले. एसपी सुनील शर्मा आणि जिल्हाधिकारी विनीत नंदनवार हे जखमी सहदेवला पाहण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पोहचले होते. मंगळवारी सायंकाळी सहदेव मित्रांसोबत स्कूटीवरून प्रवास करीत होता. त्यावेळी अचानक रस्त्यावरील वाळूमुळे वाहन उलटले व अपघात झाला. उपस्थित लोकांच्या मदतीने सहदेवला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Jalgaon-Surat Goods Train Derails: अमळनेर रेल्वे स्थानकात जळगाव-सूरत मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत; पहा कोणत्या गाड्या वळवल्या, कोणत्या रद्द ?
Advertisement
Advertisement
Advertisement