Aashiqui 3: अभिनेता Kartik Aaryan दिसणार 'आशिकी 3' मध्ये; शेअर केले चित्रपटाचे मोशन पोस्टर (Watch Video)
अनु अग्रवाल आणि राहुल रॉय अभिनीत मूळ आशिकी 1990 मध्ये प्रदर्शित झाला होता.
आशिकी आणि आशिकी 2 या दोन सुपरहिट चित्रपटांनंतर आता आशिकी 3 ची घोषणा करण्यात आली आहे. नुकतीच बातमी आली होती की, अनुराग बासू या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. आता या चित्रपटात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार असून, त्याचे मोशन मोशन पोस्टर समोर आले आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत कोण दिसणार आहे, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. मात्र आशिकी 3 या चित्रपटात जेनिफर विंगेट मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.
अनु अग्रवाल आणि राहुल रॉय अभिनीत मूळ आशिकी 1990 मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. त्याच वेळी, त्याचा दुसरा भाग 'आशिकी 2' 2013 मध्ये रिलीज झाला होता. आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
Ab Tere Bin Ji Lenge Hum
Zeher Zindagi Ka Pi Lenge Hum 🎶 #Aashiqui3 ❤️
This one is going to be
heart-wrenching !!
My First with Basu Da 🤗@basuanurag @ipritamofficial #BhushanKumar #MukeshBhatt @TSeries @VisheshFilms @visheshb7@sakshib8#KrishanKumar #ShivChanana pic.twitter.com/kSGK8YdksP
— Kartik Aaryan (@TheAaryanKartik) September 5, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 06, 2022 03:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

