5G Wireless Network: जुही चावलाची दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे धाव; सिंगल बेंचच्या आदेशाला आव्हान, उद्या पार पडणार सुनावणी

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने 5G वायरलेस नेटवर्क प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे

Juhi Chawla (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने 5G वायरलेस नेटवर्क प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या नेटवर्कच्या रेडिएशनचे मानव, प्राणी आणि वनस्पतींवर होणारे दुष्परिणाम सांगत, अभिनेत्रीने सिंगल बेंचच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठात आव्हान दिले आहे. सिंगल बेंचने अभिनेत्रीची याचिका फेटाळून लावत तिला 20 लाखांचा दंड ठोठावला होता. आता जुहीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे खंडपीठ 23 डिसेंबरला म्हणजेच गुरुवारी सुनावणी करणार आहे.

जुही चावला, वीरेश मलिक आणि टीना वचानी यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, जर दूरसंचार उद्योगातील 5G ​​योजना पूर्ण झाल्या, तर पृथ्वीवरील कोणताही माणूस, प्राणी, पक्षी इत्यादी त्याच्या विपरीत परिणामांपासून वाचणार नाही. या संदर्भात उच्च न्यायालयाने जूनमध्ये अभिनेत्रीची याचिका फेटाळून लावत तिला चांगलेच खडसावले होते. कोर्टात अभिनेत्रीच्या या याचिकेला पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले होते.