बांग्लादेशी गायक Hero Alom ला त्याच्या 'ट्यूनलेस' गाण्यामुळे पोलिसांनी केली अटक, अधिकाऱ्यांनी गाणे गाण्यावर घातली बंदी, पाहा काय आहे कारण
हिरो अलोम या नावाने प्रसिद्ध असलेल्या बांग्लादेशी गायकाला पोलिसांनी त्याच्या गाण्यामुळे अटक केली आहे आणि तुमचे गाणे 'वेदनादायक' आहे कधीही क्लासिकल गाणी गाऊ नकोस, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Bangladeshi Singer Hero Alom Gets Arrested: हिरो अलोम या नावाने प्रसिद्ध असलेल्या बांग्लादेशी गायकाला पोलिसांनी त्याच्या गाण्यामुळे अटक केली आहे आणि तुमचे गाणे 'वेदनादायक' आहे कधीही क्लासिकल गाणी गाऊ नकोस, असे म्हणत त्याचे काम थांबवण्यास सांगितले. अश्रफुल हुसेन अलोम हा एक गायक आहे. हिरो अलोमला त्याच्या विचित्र शैलीमुळे ओळखले जाते. तथापि, रवींद्रनाथ टागोर आणि काझी नझरूल इस्लाम यांचे गाणे गायल्यामुळे तो अडचणीत आला आहे. त्याच्या गाण्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याला वेठीस धरले. कलाकाराने लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल आणि त्याच्या व्हिडिओसाठी पोलिसांचा गणवेश घातल्याबद्दल माफी मागितली आहे. हिरो अलोमने अचानक झालेल्या अटकेविरोधात आवाज उठवला आणि एका निवेदनात त्याचा "मानसिक छळ" झाल्याचे उघड केले. अधिकाऱ्यांनी आपल्याशी उद्धटपणे वागल्याचा दावाही त्यांनी केला. [हे देखील वाचा : Ranveer Singh Bold Photoshoot: रणवीर सिंगला मिळाले आणखी एका बोल्ड फोटोशूटसाठी आमंत्रण; PETA ने पाठवले पत्र]
Hero Alom काय म्हणाला, पाहा व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)