‘Bhool Bhulaiyaa 3′ Trailer: 'भूल भुलैया 3'चा ट्रेलर रिलीज, हॉरर आणि कॉमेडीने वाढवली चाहत्यांची उत्सुकता
जयपूर येथे एका भव्य कार्यक्रमात चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच करण्यात आला.
‘Bhool Bhulaiyaa 3′ Trailer: भूल भुलैया 3 च्या निर्मात्यांनी अखेर कार्तिक आर्यन(Kartik Aaryan), तृप्ती डिमरी, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर(Bhool Bhulaiyaa 3 TrailerOut ) लॉंच केला आहे. बुधवारी जयपूर येथे एका भव्य कार्यक्रमात चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच करण्यात आला. ट्रेलरची सुरुवात “हवेली” चे दरवाजे उघडण्यापासून होते. कार्तिक रूह बाबाच्या भूमीकेत दिसणार आहे. एक नाही तर दोन मंजुलिकांशी लढणार आहे. अभिनेत्री तृप्ती डिमरी (Triptii Dimri) त्याच्या प्रेमीकेच्या भूमिकेत दिसत आहे. राजपाल यादव आहे, जो छोटा पंडितच्या भूमीकेत आहे. 'भूल भुलैया 3' हा चित्रपट 2007 मध्ये आलेल्या फ्रेंचाइजीचा तिसरा भाग आहे. (हेही वाचा: Celebrity Hacker Hot List 2024: देशातील 'या' 10 सेलिब्रिटींच्या नावावर होत आहेत सर्वाधिक घोटाळे; McAfee ने जारी केली यादी, Orry, Diljit Dosanjh, Alia Bhatt चा समावेश)
'भूल भुलैया 3'चा ट्रेलर रिलीज
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)