Ola Electric Scooters at Maha Kumbh 2025: महाकुंभात आता ओलाची एंट्री; कमी खर्चात प्रवास करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या 1,000 इलेक्ट्रिक स्कूटर्स

ओलाने प्रयागराजपर्यंत आणि शहरातील प्रवासासाठी अनेक सेवा सुरू केल्या आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या शटल्स, परवडणाऱ्या टॅक्सी भाड्याच्या योजना, तसेच विमानतळ व रेल्वे स्थानकांवर विशेष ट्रान्झिट सुविधा समाविष्ट आहेत.

Ola (PC-Facebook)

Ola Electric Scooters at Maha Kumbh 2025: उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्यांपैकी एक, महा कुंभ 2025 चे आयोजन केले गेले आहे. 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालणाऱ्या या मेळ्यात सुमारे 400 दशलक्ष भाविक सहभागी होतील, असा अंदाज आहे. आता कुंभमेळ्यातील लाखो भाविकांच्या प्रवासाला सुलभ करण्यासाठी ओला आणि उबर या कंपन्यांनी विशेष वाहतूक सेवा जाहीर केल्या आहेत. ओलाने महा कुंभ 2025 साठी 1,000 इलेक्ट्रिक स्कूटर्स उपलब्ध करून दिल्या आहेत. या इको-फ्रेंडली वाहनांमुळे मेळ्याच्या विस्तृत परिसरात प्रवास अधिक सुलभ आणि परवडणारा होईल. ओलाने ‘कुंभ सहाय्याक’ नावाचे विशेष अॅप तयार केले आहे. हे अॅप वापरकर्त्यांना नेव्हिगेशन, कुंभ मेळ्याचा इतिहास, विधी, आणि आकर्षणांबद्दल माहिती देते. अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या या अॅपमध्ये गोपनीयतेसाठी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.

ओलाने प्रयागराजपर्यंत आणि शहरातील प्रवासासाठी अनेक सेवा सुरू केल्या आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या शटल्स, परवडणाऱ्या टॅक्सी भाड्याच्या योजना, तसेच विमानतळ व रेल्वे स्थानकांवर विशेष ट्रान्झिट सुविधा समाविष्ट आहेत. (हेही वाचा: Kia Syros Unveiled in India: किआने भारतात सादर केली प्रीमियम 7-सीटरची लक्झरी SUV सिरोस; जानेवारी 2025 पासून बुकिंग सुरू, जाणून घ्या फीचर्स)

Ola Electric Scooters at Maha Kumbh 2025:

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now