Kinetic Green ने भारतीय बाजारात लाँच केली Zulu Electric Scooter; जाणून घ्या किंमत आणि खास वैशिष्ट्ये

EV निर्मात्याचा दावा आहे की, झुलू इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर सुमारे 104 किलोमीटर प्रवास करू शकते. या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 60 किमी आहे.

Kinetic Green ने भारतीय बाजारात लाँच केली Zulu Electric Scooter; जाणून घ्या किंमत आणि खास वैशिष्ट्ये
Zulu Electric Scooter (Photo Credit - Twitter/@KadirBhaiLY)

Kinetic Green Zulu Electric Scooter: पुण्यातील Kinetic Green ने भारतात नवीन झुलू इलेक्ट्रिक स्कूटर (Zulu Electric Scooter) लॉन्च केली आहे. ज्याची किंमत 95,000 रुपये (एक्स-शोरूम) आहे. ईव्ही निर्मात्याने म्हटले आहे की, इलेक्ट्रिक स्कूटर पूर्णपणे भारतात तयार केली जाईल. कायनेटिक ग्रीन झुलू इलेक्ट्रिक स्कूटरला ऍप्रॉन-माउंट एलईडी हेडलॅम्प मिळतो. (वाचा - Maruti Suzuki to Hike Prices: नवीन वर्षात कार खरेदी करणाऱ्यांना झटका; जानेवारीपासून मारुती सुझुकीच्या गाड्या होणार महाग)

झुलू इलेक्ट्रिक स्कूटर वैशिष्ट्य -

  • कायनेटिक ग्रीन झुलूची लांबी 1,830 मिमी, रुंदी 715 मिमी आणि उंची 1,135 मिमी आहे.
  • त्याचा व्हीलबेस 1,360 मिमी आणि ग्राउंड क्लिअरन्स 160 मिमी आहे.
  • इलेक्ट्रिक स्कूटरचे वजन 93 किलोग्रॅम असून ती 150 किलोपर्यंत वजन उचलू शकते.
  • झुलू स्कूटरमध्ये 2.27 kWh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे.
  • EV निर्मात्याचा दावा आहे की झुलू इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर सुमारे 104 किलोमीटर प्रवास करू शकते.
  • या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 60 किमी आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 11, 2023 04:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).