Audi Q7 च्या ब्रेकमध्ये आढळली समस्या; ग्राहकाला 60 लाखांची नुकसान भरपाई देण्याचे ग्राहक विवाद निवारण आयोगाचे Volkswagen ला आदेश

तामिळनाडू ग्राहक विवाद निवारण आयोगाने फॉक्सवॅगन समुहाला या Q7 च्या मालकाला 60 लाख रुपयांचा संपूर्ण खरेदी खर्च तसेच खटल्याच्या खर्चापोटी 25,000 रुपये परत करण्याचे निर्देश दिले आहेत.

फॉक्सवॅगन (Photo by Steffi Loos/Getty Images)

तामिळनाडू ग्राहक विवाद निवारण आयोगाने फॉक्सवॅगनला एका ऑडी Q7 (Audi Q7) च्या मालकाला 60 लाख रुपये परत करण्याचे आदेश दिले आहेत. एका अहवालानुसार, या एसयुव्हि (SUV) मालकाच्या 2009 च्या मॉडेल Audi Q7 मध्ये 2014 पासून ब्रेक-संबंधित समस्या वारंवार येत होत्या. अनेक तक्रारींनंतरही ऑडी या समस्येचे निराकरण करण्यात अयशस्वी ठरले, तेव्हा Q7 मालकाने शेवटी न्यायालयात धाव घेतली.

तामिळनाडू ग्राहक विवाद निवारण आयोगाने फॉक्सवॅगन समुहाला या Q7 च्या मालकाला 60 लाख रुपयांचा संपूर्ण खरेदी खर्च तसेच खटल्याच्या खर्चापोटी 25,000 रुपये परत करण्याचे निर्देश दिले आहेत. या ऑडी Q7 मालकाचा एक अपघात होता होता टळला होता. त्यावेळी त्याला कारमध्ये 'ब्रेक सिस्टीम फेल्युअर' समस्या असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याने 2.4 लाख रुपये खर्चून ही ब्रेक-संबंधित समस्या निवारण्याचा प्रयत्न केला मात्र काही उपयोग झाला नाही. पुढे वारंवार कंपनीकडे तक्रार करूनही कंपनी या समस्येचे निराकरण करण्यात अपयशी ठरल्यानंतर, मालकाने भरपाई आणि वाहन बदलण्यासाठी कमिशनकडे संपर्क साधला होता. आता आयोगाने कंपनीला आदेश दिले आहेत की त्यांनी ग्राहकाला 60 लाख रुपयांची भरपाई द्यावी.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)