साडीत Back Flip Jump मारणाऱ्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव (Watch Video)

महिला चक्क साडीमध्ये Flip Jump मारताना दिसत आहे. ती महिला किती ग्रेसफुली फ्लिप ज्मप मारते हे या स्लो मोशन व्हिडिओतून समोर येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

साडीत Back Flip Jump मारणाऱ्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव (Watch Video)
Woman somersault in saree (Photo Credits: Video Grab)

सध्याच्या काळात आपल्यातील कौशल्य जगाला दाखवून देण्यासाठी सोशल मीडिया हा एक उत्तम प्लॅटफॉर्म बनला आहे. फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter) यांसारख्या सोशल मीडियाच्या इतर माध्यमात आपण लोकांच्या कौशल्याचे अनेक व्हिडिओज पाहतो. नृत्य, गाणे, चित्रकला, हस्तकला, कुकींग यांसारख्या विविध टॅलेंटची प्रचिती देणारे अनेक सोशल मीडियातून आपल्या समोर येत आहेत. असंच एक अनोखं कौशल्य असलेल्या महिलेचा व्हिडिओ सध्या ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही महिला चक्क साडीमध्ये Back Flip Jump मारताना दिसत आहे. ती महिला किती ग्रेसफुली फ्लिप ज्मप मारते हे या स्लो मोशन (Slow Motion) व्हिडिओतून समोर येते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'India's Got Talents' म्हणत नेटकरी या महिलेचे कौतुक करत आहेत. (सिक्स पॅक अ‍ॅब्स, 3000 हुन अधिक फुटबॉल किक-अप; लिओनेल मेस्सीच्या 6 वर्षीय चाहत्याने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, Video)

Flip Jump मारताना या महिलेने साडी नेसली असून पायात शूज देखील नाहीत. ती ज्या ठिकाणी जम्प मारत आहे तो रस्ता देखील खडबडीत आहे. त्यामुळे सर्वांना तिचे अधिक कौतुक वाटत आहे. मात्र हा व्हिडिओ नेमका कुठला आहे? हे कळू शकलेले नाही. तसंच त्या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. नेटकरी त्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असून ती महिला जिमन्यास्टिक शिकली आहे का? हा प्रश्नही नेटकऱ्यांना पडला आहे.

पहा व्हिडिओ:

अशाप्रकारचे अनेक व्हिडिओज यापूर्वीही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. देशाच्या विविध भागातून समोर येणारे हे व्हिडिओज लोकांमधील लपलेले कौशल्य सर्वांसमोर आणत आहेत. त्यामुळे अनेकांच्या कलेला चांगलाच वाव मिळाला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 14, 2020 11:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).