नवरा झोपेत असताना नायजेरियन महिलेने घेतला पतीच्या जननेंद्रियाचा चावा
त्यानंतर या पुरुषाने तिच्या स्तनावर मारहाण करत खुणा केल्या आहेत. या दोघांमध्ये झालेल्या हिंसक भांडणात आरोपी महिलेने पती झोपत असताना आपल्या दाताच्या साहाय्याने जननेंद्रिय कापले. या धक्कादायक घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एका नायजेरियन महिलेने (Nigerian Women) भांडणात तिच्या नवऱ्याच्या लिंगाला चावा घेतल्याची घटना घडली आहे. त्यानंतर या पुरुषाने तिच्या स्तनावर मारहाण करत खुणा केल्या आहेत. या दोघांमध्ये झालेल्या हिंसक भांडणात आरोपी महिलेने पती झोपत असताना आपल्या दाताच्या साहाय्याने जननेंद्रिय (Penis) कापले. या धक्कादायक घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, उदोचुकवु न्विमो असं या पुरुषाचं नाव आहे. न्विमो याच्या 25 वर्षीय पत्नीने तो झोपत असताना दाताच्या साहाय्याने त्याच्या जननेंद्रियावर हा हल्ला केला आहे. स्थानिक वृत्तानुसार, ही घटना इमो स्टेटच्या उमुफुगा उममुहूमध्ये (Umuofuga Umuhu, Imo State) घडली. (हेही वाचा - Animal Cruelty: आसाम मध्ये चित्त्याला मारहाण करून निर्घृण हत्या; निर्दयी लोकांनी त्याच्या शवासोबत काढली परेड (Watch Video))
डेली पोस्ट या स्थानिक वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या जोडप्याला दोन मुले आणि एक मुलगी आहे. पीडित मुलीच्या चुलतभावाने सांगितले की, आरोपी महिलेच्या प्रियकराने रविवारी 31 मे रोजी तिला उचलून रात्री उशिरा घरी आणले. त्यामुळे आरोपी महिला आणि तिच्या नवऱ्यांत भांडण झाले. आजूबाजूला आलेल्या काही शेजा्यांनी त्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, त्याच मध्यरात्री या महिलेने पतीच्या जननेंद्रियाला चावा घेतला. त्या रात्री त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या महिलेने नशेत असताना हे कृत्य केलं. या महिलेचे तिच्या पतीसोबत नेहमी भांडण होत असतं. सध्या या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आतापर्यंत अशी घटना घडण्याची ही पहिली वेळ नाही. तामिळनाडूमधील एका महिलेने आपल्या नवऱ्यांचे जननेंद्रिय कापले होते. तिला थुरैमुलाई गावातून अटक करण्यात आली होती. या प्रकारानंतर आरोपी महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. अशीच एक घटना मुजफ्फरनगरमध्येदेखील घडली होती.