Wedding Viral Video: केरळीय नवरी Chenda वाद्य वाजवताना व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर (Social Media) एका केरळीय मुलीचा (Kerala Bride) व्हिडिओ व्हायरल (Viral Videos) झाला आहे. जी लग्नासाठी बोहल्यावर उभा राहणार आहे. ती पूर्णपणे वधूच्या वेशात दिसते. वधूचे कपडे घालून सज्ज झालेली ही नवरी चक्क चेडा वाद्य (Chenda Instrument) वाजवत आहे

Wedding Viral Video: केरळीय नवरी Chenda वाद्य वाजवताना व्हिडिओ व्हायरल
Wedding Viral Video | (Photo Credit - twitter)

सोशल मीडियावर (Social Media) एका केरळीय मुलीचा (Kerala Bride) व्हिडिओ व्हायरल (Viral Videos) झाला आहे. जी लग्नासाठी बोहल्यावर उभा राहणार आहे. ती पूर्णपणे वधूच्या वेशात दिसते. वधूचे कपडे घालून सज्ज झालेली ही नवरी चक्क चेडा वाद्य (Chenda Instrument) वाजवत आहे. या नवरीला वाद्यवाजवणारी इतरहीमंडळी मोठ्या तल्लीनेतेने साथ देताना पाहायला मिळत आहेत. या आधीही सोशळ मीडियावर विवाहाचे अनक व्हिडिओ व्हायरल (Wedding Viral Video) झाले आहेत. ज्यात वर-वधू आपल्या हटके कृतीमुळे सोशल मीडियावर व्हायरल होतात. यात कधी कधी वर-वधू फोटोग्राफी करण्यासाठी स्टंट करतानाही आढळून येतात. कधी या गोष्टी मनमोहक असतात तर कधी इतक्या विचित्र की, हे कृत्य करताना त्यांना समाजमाध्यमांवर ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. त्यामुळे सोशल मीडियावरील कोणतीही कृतीही हीअनेकदा दुधारी तलवार ठरते.

प्राप्त माहितीनुसार, व्हायरल झालेला व्हिडिओ केरळ राज्यातील गुरुवायूर मंदिरातील आहे. या मंदिरात नवरी मुलगी चेडा वाद्य वाजवते आहे. हे वाद्य वाजवताना तिचे वडीलही हे वाद्य वाजविण्याच्या उत्साहात सहभागी झाले आहेत. वधूचे वडील चेंदाई मास्तर आहेत. (हेही वाचा, Viral Video: नवरीचे रुप पाहून नवदेवाला आले मांडवतच रडू, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)

व्हिडिओ

व्हिडिओ

व्हिडिओ

व्हिडिओ

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर अपलोड केल्यापासून आतापर्यंत हे वृत्त लिहीपर्यंत 48,000 जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओत वधू आणि वर दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद केवळ उत्साह वाढवणारा आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका युजर्सने भावना व्यक्त केली आहे, वर वधुंमध्ये आनंदाची आणि उत्साहाची भावना आहे. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, तिचे हावभाव, तिची साडी, तिची उर्जा जबरदस्त आहे. शेवटी काय तर हे तिचे लग्न आहे. देव तिला आशीर्वाद देवो.

(The above story first appeared on LatestLY on Dec 27, 2022 03:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).