Wedding Viral Video: नवरीपुढे 'नही झुकेगा **' म्हणता म्हणता अखेर लग्नाच्या मांडवात झुकलाच नवरदेव; वरमाला घालतानाचा व्हिडिओ व्हायरल
नवरदेव काहीसा पुष्पा: द राईस (Pushpa: The Rise) सिनेमातील 'झुकेगा नही साला' (Main Jhukega Nahi Saala) या विचारात दिसतो. काही काळ तो आपल्या विचारावर ठाम दिसतोही. पण, पुढच्याच काही क्षणात काय घडते हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागे
लग्नाच्या मांडवात (Wedding Viral Video) अनेक गमती-जमती आणि किस्से घडतात. सर्वांच्याच लग्नात थोड्या-अधिक प्रमाणात अशा घटना घडत असतात. पण, अलिकडे इंटरनेट आणि डिजिटल यूग आल्याने हे किस्से, घटना व्हायरल होतात आणि जनमानसांपर्यंत पोहोचतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लग्नात बोहल्यावर चढताना वर-वधू एकमेकांना पुष्पमाला (Bride Groom Varmala Video:) अर्पण करतात. सर्वच लग्नांमध्ये ही पद्धत पाहायला मिळते. व्हायरल झालेल्या व्हिडिओतही हेच दिसते. पण, हे करत असताना नवरदेव काहीसा पुष्पा: द राईस (Pushpa: The Rise) सिनेमातील 'झुकेगा नही साला' (Main Jhukega Nahi Saala) या विचारात दिसतो. काही काळ तो आपल्या विचारावर ठाम दिसतोही. पण, पुढच्याच काही क्षणात काय घडते हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागेल.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत आपण पाहू शकता स्टेजवर वर आणि वधू उपस्थित आहेत. दोघेही एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. परंतू, दोघांमध्ये काहीशी थट्टा-मस्करी सुरु आहे. वधू जेव्हा वरमाला घालण्यासाठी नवरदेवाजवळ पोहोचते तेव्हा नवरदेव काहीसा अधिकच ताठ उभा राहतो. आपल्या चंप्यांवर उभा राहून तो टाचाही उचलतो. त्यामुळे तो आहे त्यापेक्षा काहीसा अधिकच उंच होतो. सहाजिकच वधूला त्याच्या गळ्यात वरमाला घालता येत नाही. मग वधू काहीशी लटके रागवते. वधू लटके रागावल्याचे पाहताच वर लगेचच पागळतो. त्यामुळे 'मैं झुकेगा नही..**' म्हणता म्हणता एकदा तो झुकतो आणि वरमाला गळ्यात घालून घेतो. (हेही वाचा, Wedding Viral Video: आगोद 'आधार' कार्ड दाखवा, मगच लग्न मंडपात प्रवेश करा; वऱ्हाडींची पंचायत, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)
व्हिडिओ
View this post on Instagram
अवघ्या काही सेकंदांचा असलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ 'weddingbazaarofficial' नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ अनेक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहून युजर्स एकापेक्षा एक मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. आतापर्यंंत या व्हिडिओला तीन हजारांपेक्षाही अधिक लाईक्स आल्या आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Sep 28, 2022 02:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

