रुग्णांच्या चेहऱ्यावर हसु येण्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी गायले 'नमो-नमो' गाणे, पहा Viral Video
या घातल व्हायरसच्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे.
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या घातल व्हायरसच्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे. कोरोना संकट काळात डॉक्टर्स, नर्स आणि अन्य आरोग्य कर्मचारी दिवसरात्र रुग्णांची सेवा करण्यात व्यस्त असतात. सध्याच्या महासंकट काळात वेळोवेळी आरोग्य कर्मचारी रुग्णांना दिलासा देण्यासाठी विविध मार्गांचा वापर करत असल्याचे दिसून येत आहेत. अशातच आता एक व्हिडिओ व्हायरल झाला असून रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आरोग्यकर्मचाऱ्यांनी सुशांत सिंह राजपूत याच्या 'केदारनाथ' चित्रपटातील नमो-नमो गाणे गायले आहे.
इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओ मध्ये रुग्णालयातील एका वॉर्डात काही रुग्ण दिसून येत आहेत. या रुग्णांच्या दरम्यान, काही आरोग्य कर्मचारी पीपीई किट घालून रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या चित्रपटातील 'नमो-नमो' गाणे गाताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.(Himalayas Viral Photos: उत्तर प्रदेशच्या सहारनपूर मधून सलग दुसर्या वर्षी हिमालयाचं दर्शन; इथे पहा वायरल फोटोज)
View this post on Instagram
A post shared by Pahadi Hai Hum 🇮🇳 Uttarakhand (@pahadi_hai_hum_official)
श्वेता सिंह कीर्ति ने शेअर केला व्हिडिओ:-
व्हिडिओत पाहू शकता की, रुग्णालयातील एक कर्मचारी पीपीई किट घालून गिटार वाजवत नमो नमो गाणे गात आहे. तर या गाण्यावर अन्य काही कर्मचारी नाचताना दिसून येत आहेत. रुग्णांसाठी हे गाणे गायले असता ते सुद्धा त्यावर गाऊ-नाचू लागले आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य सुद्धा दिसून आले.