Make in India: देसी जुगाड सोशल मीडियावर VIDEO VIRAL; पुणे येथे आत्मनिर्भर शिक्षिकेचा Online Class

फळ्यावर लिहित आहेत. मोबाईलमध्ये त्याचे चित्रिकरण होत आहे. LinkedIn वर आतापर्यंत 368 पेक्षाही अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

Chemistry Teacher | (Photo Credits: Moumita B Linkedin)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट आणि लॉकडाऊन (Lockdown) असा दुहेरी सामना करताना अनेकांनी डिजिटल माध्यमाचा स्वीकार केला. प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रात ऑनलाइन पद्धत वापरता येऊ शकते का यावरही खल सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही Make in India हा नारा देऊन झाल्यावर कोरोना विरोधात आता आत्मनिर्भर भारत (Atmanirbhar Bharat) हा नारा दिला आहे. दरम्यान, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत या सर्वांचा पुणे येथील शिक्षिकेने खास आपल्या पद्धतीने वापर केला आहे. ही शिक्षिका ऑनलाईन क्लास (Online Class) घेत आहे. त्यासाठी तिने जमवलेला देसी जुगाड (Desi Jugaad) सोशल मीडियावर चांगलाचच चर्चेत आला आहे. या देशी जुगाडाचा सोशल मीडियावर VIDEO VIRAL झाला आहे.

कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्र आणि देशभरातील शाळा-महाविद्यालयं मार्च महिन्यापासूनच बंद आहेत. ही बंद असलेली महाविद्यालयं पुन्हा सुरु करण्याचा सरकारचा विचार सुरु आहे. मात्र, अद्यापही हा विचारच सुरु आहे. तो विचार निर्णय होऊन प्रत्यक्षात अद्यापतरी उतरला नाही. अशा स्थितीत विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना पाहायला मिळत आहे. (हेही वाचा, मुंबईवरील निसर्ग चक्रीवादळाचा धोका टळल्यानंतर सोशल मीडियात धम्माल मीम्स व्हायरल!)

ट्विट

दरम्यान, पुणे येथील एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन क्लास सुरु केला आहे. संबंधित शिक्षिका या रसायनशास्त्र विषय शिकवतात. मात्र, ऑनलाईन क्लास घेताना त्यांनी वापरलेली पद्धत मात्र सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. त्याचे झाले असे, पुणे येथे रसायनशास्त्र विषयाच्या शिक्षिका मौमिता बीने ऑनलाइन क्लास घेतात. परंतू, त्यासाठी त्यांच्याकडे ट्रायपॉड नाही. मग आता चित्रिकरण करायचं कसं आणि विद्यार्थ्यांपर्यं पोहोचायचं कसं हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. त्यावर त्यांनी शक्कल लढवली. ज्यासाठी तुम्हाला खालील व्हिडिओ पाहता येऊ शकतो.

ट्विट

मौमिता बीने यांनी आपला व्हिडीओ LinkedIn वर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, दोन दोऱ्यांच्या आधारे हँगर लटकवून त्यामध्ये मोबाईल अडकवला आहे. पुढे मौमिता बीने शिकवत आहेत. फळ्यावर लिहित आहेत. मोबाईलमध्ये त्याचे चित्रिकरण होत आहे. LinkedIn वर आतापर्यंत 368 पेक्षाही अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif