उत्तराखंड: 4 किलोमीटर बर्फातून चालत नवरदेव पोहोचला लग्नमंडपात; पहा व्हायरल फोटो

या सोहळ्यानिमित्त घरातील सर्वांचीच घाई-गरबड सुरू असते. सध्या सोशल मीडियावर हवामानातील बदलामुळे विवाहसोहळ्यासाठी निघालेल्या एका नवरदेवाचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला आहे. उत्तराखंडमधील चामोली येथे सध्या प्रचंड हिमवर्षाव होत आहे. चामोलीतील तापमान शुन्य डिग्री सेल्सिअसवर गेल्याने तेथील लोकांना घरातून बाहेर पडणही अशक्य झाल आहे. परंतु, असं असताना या नवरदेवाने चक्क बर्फातून 4 किलोमीटरचे अंतर पार करत आपला विवाहसोहळा गाठला आहे.

Uttarakhand Groom Walks 4 Km to Reach Bride's Home (PC- ANI/ Twitter)

विवाहसोहळा म्हटलं की, घरात अगदी आनंदाच वातावरण असतं. या सोहळ्यानिमित्त घरातील सर्वांचीच घाई-गरबड सुरू असते. सध्या सोशल मीडियावर हवामानातील बदलामुळे विवाहसोहळ्यासाठी निघालेल्या एका नवरदेवाचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला आहे. उत्तराखंडमधील (Uttarakhand) चामोली (Chamoli District) येथे सध्या प्रचंड हिमवर्षाव (Heavy Snowfall) होत आहे.

चामोलीतील तापमान शुन्य डिग्री सेल्सिअसवर गेल्याने तेथील लोकांना घरातून बाहेर पडणही अशक्य झाल आहे. परंतु, असं असताना या नवरदेवाने चक्क बर्फातून 4 किलोमीटरचे अंतर पार करत आपला विवाहसोहळा गाठला आहे. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील ही घटना घडली. बिजरा येथील नवरी मुलीच्या घरी पोहोचण्यासाठी नवरदेवाने चक्क 4 किलोमीटर बर्फाने संपूर्णपणे झाकलेल्या भागातून वाट काढली. त्याने डोक्यावर छत्री घेऊन 4 किलोमीटरचे अंतर कापले. (हेही वाचा - तामिळनाडू: 13 वर्षाच्या मुलीच्या पोटात सापडले अर्धा किलो केस आणि शॅम्पूची पाकिटं)

सध्या उत्तराखंडमध्ये प्रचंड हिमवृष्टी होत आहे. या हिमवृष्टीमुळे काही लग्नही रद्द होत आहेत. परंतु, असं असताना या नवरदेवाने हार मानली नसून तो या बर्फातून रस्ता काढत विवाहसोहळ्याला पोहचला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर नेटीझन्सकडून या नवदेवाचं कौतुक होत आहे.