धोका टळला: एक वर्षाचा मुलगा सापाला चावाला, शरीराचा तुकडाच गिळला खेळताना
डॉक्टरांनी मुलाला तपासून अॅटी वेनम इंजेक्शन (Anti Venom Injection) दिले. मुलाला काही काळ अतिदक्षता विभागात भरती केले. सध्या या मुलाची प्रकृती चांगली आहे. डॉक्टरांनी माहिती देताना सांगितले की, हा एक विषारी साप होता. योग्य वेळी उपचार मिळाल्याने मुलाचे प्राण वाचले.
माणसाला साप (Snake) चावण्याच्या घटना आपण अनेकदा ऐकतो, पाहतो, वाचतो. पण, सापाला माणूस चावल्याची घटना विरळाच. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरेली (Bareilly) जिल्ह्यातील फतेहगंज (Fatehganj) परिसरातील भोलापूर गावात अशीच एक आश्चर्यकारक घडली आहे. अंगणात खेळत असलेल्या एक वर्षाच्या मुलाने चक्क विषारी सापालाच चावा घेतला. या मुलाने सापाच्या शरीराचा थोडासा तुकडाही तोडला आणि तो गीळलाही. दुसारा तुकडा मुलगा चघळत असताना मुलाच्या आईचे लक्ष गेले आणि सर्व प्रकार उघडकीस आला.
प्राप्त माहतीनुसार, मुलगा तोंडात काही तरी चघळत असल्याचे ध्यानात आल्याने आईने पाहिले. तिने मुलाच्या तोंडात हात घालून पाहिले असता रक्ताने भरलेला मंसाचा तुकडा आढळला. हा तुकडा कसला म्हणून तिने इकडेतिकडे पाहीले तर अंगणात एक ठिकाणी शरीरातून रक्त निघत असलेला साप पाहायला मिळाला. घडल्या प्रकाराने आई घाबरुन गेली. तिने तातडीने मुलाच्या वडीलांना बोलावले. (हेही वाचा, साप चावल्यावर या 7 प्रकारे मानवी शरीरात चढते विष, होतो मृत्यू; वाचा महत्त्वपूर्ण माहिती)
मुलाच्या वडीलांनी मुलाला आणि जवळपास सहा इंच लांबीच्या मृत सापाला घेऊन रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी मुलाला तपासून अॅटी वेनम इंजेक्शन (Anti Venom Injection) दिले. मुलाला काही काळ अतिदक्षता विभागात भरती केले. सध्या या मुलाची प्रकृती चांगली आहे. डॉक्टरांनी माहिती देताना सांगितले की, हा एक विषारी साप होता. योग्य वेळी उपचार मिळाल्याने मुलाचे प्राण वाचले.