अमेरिकन डिप्लोमॅट्स जेव्हा सई ताम्हणकर, रिंकू राजगुरू आणि सुबोध भावे च्या मराठी सिनेमातील लोकप्रिय डायलॉग्स बोलतात... दादासाहेब फाळके जयंती आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर US Consulate Mumbai ने शेअर केला मजेदार Video
सई ताम्हणकरचा (Saie Tamhankar) 'तु ही रे' पासून रिंकू राजगुरूच्या (Rinku Rajguru) 'सैराट' सिनेमामधील लोकप्रिय डायलॉग्स अमेरिकन डिप्लोमॅट्सने त्यांच्या अंदाजात म्हटले आहेत
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांची आज जयंती (30 एप्रिल) आणि उद्या (1 मे) येणारा महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) यांच्या पार्श्वभूमीवर आज US Consulate Mumbai ने एक धम्माल व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अमेरिकन डिप्लोमॅट्स चक्क मराठी सिनेमामधील काही डायलॉग्स बोलत आहेत. यामध्ये सई ताम्हणकरचा (Saie Tamhankar) 'तु ही रे' पासून रिंकू राजगुरूच्या (Rinku Rajguru) 'सैराट' सिनेमामधील लोकप्रिय डायलॉग्सचा समावेश आहे. तुम्हीच पहा हा मजेशीर व्हिडिओ. (Dadasaheb Phalke Birth Anniversary 2019: भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी कसा बनवला पहिला सिनेमा ‘राजा हरिश्चंद्र’!)
US Consulate Mumbai चा खास व्हिडिओ
व्हिडिओमध्ये अमेरिकन डिप्लोमॅट्सने सई ताम्हणकरचा 'तु ही रे' सिनेमातील, लई भारी सिनेमातील रितेश देशमुख, सैराट मधील रिंकू राजगुरू व 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' सिनेमातील सुबोध भावेच्या डायलॉग्सचा समावेश आहे. हा व्हिडिओ ट्विट करताना 'On Dadasaheb Phalke’s birth anniversary, here’s our tribute to Marathi cinema… Watch, vote, and celebrate #MaharashtraDay with us!'असा खास मेसेज लिहण्यात आला आहे.
मराठी कलाकारांनीदेखील या प्रयत्नांचं कौतुक केले आहे. दादासाहेब फाळकेंनी परदेशात जाऊन सिनेनिर्मितीचं शिक्षण घेतलं. आज त्यांची 149 वी जयंती आहे.