प्रशिक्षित हत्तीच्या मदतीने जंगली हत्तीला केले नियंत्रित; पहा Viral Video
परंतु, एका हत्तीला दुसरा हत्ती काबूत आणतोय? असं कधी पाहिलंय? तुम्ही असे कधी पाहिले नसेल तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Viral Video: हत्तींचे (Elephants) विविध व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील. परंतु, एका हत्तीला दुसरा हत्ती काबूत आणतोय? असं कधी पाहिलंय? तुम्ही असे कधी पाहिले नसेल तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक प्रशिक्षित हत्ती जंगली अनियंत्रित झालेल्या हत्तीला नियंत्रित करताना दिसत आहे. यात एक प्रशिक्षित हत्ती दुसऱ्या जंगली हत्तीला (Wild Elephant) टक्कर देऊन नियंत्रित करतो. हा व्हिडिओ भारतीय वन्य सेवा अधिकारी (Indian Forest Service) सुधा रामेन (Sudha Ramen) यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यापूर्वी हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी प्रविण अंगुसामी यांनी ट्विटरवर शेअर केला होता. (Viral Video: तुम्ही कधी क्रिकेट खेळणारा हत्ती बघितला का? व्हिडिओ पाहून सर्वांच्या भुवया उंचावतील)
सुधा रामेन यांनी हा व्हिडिओ शेअर करत वन्यजीव व्यवस्थापनाशी निगडीत लोकांसमोर येणाऱ्या आव्हानांबद्दल सांगितले आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, एक प्रशिक्षित हत्ती कुमकी (तमिळमध्ये प्रशिक्षित हत्तीला कुमकी असे म्हणतात) दुसऱ्या जंगली हत्तीला नियंत्रित करतो? असे कधी तुम्ही पाहिले आहे? पहा अशा प्रत्येक प्रसंगात वनात राहणारे लोक आव्हान आणि जोखमींचा सामना करतात. वन्यजीव व्यवस्थापन हे सर्वात आव्हानात्मक व्यवसायांपैकी एक आहे. (Uttar Pradesh: उत्तर प्रदेशात लग्न समारंभात हत्तीची एन्ट्री, जीव वाचवण्यासाठी वधूवरांची पळापळ, Watch Video)
पहा व्हिडिओ:
वन कामगार, पशुवैद्य आणि कर्मचारी यांच्या एका युनिटने इतके काम केले होते. जंगली हत्तींना नियंत्रित करण्यासाठी कुमकी हत्तींचा वापर केला आहे. कुमकी हत्तींना शक्यतो वन्य विभागाकडून प्रशिक्षित केले जाते.