ही राजकन्या  विकत आहे आपल्या घाणेरड्या अंडरवेअर; ऑनलाइन खरेदी करण्यासाठी लोकांनी केली गर्दी
Amelia Windsor ( Photo Credit - Instagram )

जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही काय कराल? हे स्पष्ट आहे की जेव्हा पैसे असतात तेव्हा लोक त्यांच्या गरजेच्या आणि सोयीच्या सर्व गोष्टी अगदी सहजपणे घेतात. परंतु जर आपल्याला हे समजले की एखाद्या देशातील राजकन्या तिचे गलिच्छ अंडरवेअर (Princess Selling Underwears Online) पैशासाठी विकत आहे तर? आपल्याला वाटते की आम्ही थट्टा करतोय, पण हे अगदी खरं आहे. यूके रॉयल्टीच्या सिंहासनासाठी 38 व्या क्रमांकाची दावेदार असणारी अमेलिया विंडसर (Amelia Windsor) तिच्या अंडरवेअरची ऑनलाईन विक्री करीत आहे.तिच्या ब्राशिवाय, ती स्पेगेटी आणि इतर इनर वेअर ही विकत आहे. अमेलियाने स्वत: याचे कारण सांगितले आहे. (काय सांगता? मुलांना 'Sex Education' देण्यासाठी त्यांच्यासोबत Porn Videos पाहते प्रसिद्ध गायिका Yuni Shara)

यूकेच्या राजकुमारी अमेलियाने तिचे अंडरवेअर विक्री केल्याच्या बातमीची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.  हे तेव्हा उघड झाले जेव्हा तिने एक ब्रालेट विक्रीसाठी ठेवले होते. एका फंक्शन दरम्यान अमेलियाने हे ब्रालेट काही काळासाठी परिधान केले होते. राजकुमारीने घातलेले कपडे विकत घेण्यासाठी लोक खूप उत्सुक आसतात आणि काही वेळातच तिचे कपडे आउट ऑफ़ स्टॉक होतात.

दिसायला आहे खूप सुंदर 

24 वर्षीय अमेलिया ही प्रिन्स हॅरी आणि प्रिन्स चार्ल्सची चुलत बहिन असून तिच्या सौंदर्यामुळे ती चर्चेत राहिली आहे. या दिवसात ती आपले कपडे ऑनलाइन विकत आहे. यामध्ये तिने आपल्या ब्रा पासून ,घातलेल्या जीन्सचा समावेश आहे. अमेलिया डीझायनर कपडे एकदाच परिधान करते आणि काही पैशासाठी ऑनलाइन विकते.

डोनेशन मध्ये जातो सगळा पैसा 

याचा खुलासा करताना अमेलिया म्हणाली की, तिचे कपडे डिझाइनर आहेत. पण राजघराण्यातील असल्यामुळे तिला पब्लिक अपीयरेंसकडे विशेष लक्ष द्यावे लागते. बर्‍याच वेळा कपड्यांची पुनरावृत्ती केली तर लोक त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात करतात जे योग्य नाही. त्यामुळे एकदा घातलेले कपडे ती पुन्हा घालत नाही. यामुळे तिच्याकडे कपड्यांचा ढीग आहे. हा ढिग साफ करण्यासाठी ती कपड्यांची विक्री करीत आहे. ती त्या अत्यंत कमी किंमतीत विकत आहेत. तसेच अमेलिया त्याच्यातून मिळालेले उत्पन्न डोनेट करते.

मॉडेलिंग विश्वात नाव कमवत आहे

2017 मध्ये, अमेलियाला रॉयल फॅमिलीच्या सर्वात सुंदर सदस्याचा टॅग प्राप्त झाला. यानंतर, अमेलियाने बर्‍याच नामांकित मॉडेलिंग एजन्सीशी करार केला. यासह ही राजकुमारी इंस्टाग्रामवरही खूप अ‍ॅक्टिव आहे. आपल्यालाही  राजकुमारी ड्रेस खरेदी करायचा असेल तर आपण तो ऑनलाइन खरेदी करू शकता. बरेच लोक ती करत असलेल्या गोष्टीचे कौतुक करीत आहेत तर काहींनी तिला लज्जास्पद म्हटले. काही लोकांनी टिप्पणी दिली की, देणगीचे कपडे विकणे कितपत योग्य आहे? ''तिच्याकडे खूप पैसा आहे, लोकांकडून कपड्यांच्या बदल्यात पैसे जमा करून नव्हे तर तिने देणगी दिली पाहिजे'' असे ही काही जण म्हणाले आहेत.