तहानलेल्या खारूताईचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ पाहून व्हाल भावूक; Watch Video

सध्या सोशल मीडियावर एका खारूताईचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटीझन्स भावनिक झाले आहेत. या व्हिडिओमध्ये एक तहानलेली खारूताई पाण्यासाठी एका व्यक्तीकडे विनंती करत आहेत. या व्यक्तीच्या हातात पाण्याची बोटल दिसत आहे. अगदी हात जोडून ही खारूताई त्याला पाणी देण्यासाठी विनंती करत आहे.

Thirsty Squirrel Asking For Water (PC - Twitter)

Thirsty Squirrel Asking For Water: सध्या सोशल मीडियावर एका खारूताईचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटीझन्स भावनिक झाले आहेत. या व्हिडिओमध्ये एक तहानलेली खारूताई पाण्यासाठी एका व्यक्तीकडे विनंती करत आहेत. या व्यक्तीच्या हातात पाण्याची बोटल दिसत आहे. अगदी हात जोडून ही खारूताई त्याला पाणी देण्यासाठी विनंती करत आहे.

तहानलेल्या खारूताईची पाण्यासाठीची धडपड पाहून या व्यक्तीने तिला पाणी पाजलं आहे. पाणी पिल्यानंतर ही खारूताई तिथून निघून गेली. हा व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे हे माहित नाही. सुसंता नंदा या आयएफएस अधिकाऱ्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. (हेही वाचा - Shiva Tandava Stotra: वाद्यांशिवाय शिवलिंगासमोर गायले ‘शिव तांडव स्तोत्र’; श्री कालिचरण महाराजांनी केलेली भगवान शिवाची स्तुती ऐकून अंगावर येईल काटा (Watch Video))

सुसांता नंदा यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 4.90 लाख लोकांनी पाहिला आहे. सध्या सोशल मीडियावर या खारूताईचा केविलवाना व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेक युजर्संनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. तसेच अनेकांनी या व्हिडिओला लाईक तसेच कमेंन्ट्स केल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement