चक्क एका विमानासोबत 6 महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहे ही युवती; लवकरच करणार लग्न, तयारी सुरु

अ‍ॅमस्टरडॅममध्ये मोठ्या थाटात हे लग्न होणार आहे

Michele Kobke (Photo Credit : Instagram)

जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये (Berlin) राहणारी एक 30 वर्षीय मुलगी, मार्चमध्ये चक्क बोईंग 737-800 शी लग्न करणार आहे. अ‍ॅमस्टरडॅममध्ये मोठ्या थाटात हे लग्न होणार आहे. या युवतीचे नाव मिशेल कोबके (Michele Kobke) असून, मार्च 2014 मध्ये तिने टेगल विमानतळावर हे बोईंग विमान सर्वप्रथम पाहिले. तेव्हापासून ती त्याच्यावर प्रेम करत होती आणि आता तिने ही लग्नाची योजना आखली आहे. मिशेलला बोईंगचे पंख, त्याच्या आकार आणि थ्रस्टर प्रचंड आवडले. मिशेलच्या मते हे तिचे Long Distance Relationship आहे. या विमानाला ती प्रेमाने सात्स म्हणते. जर्मनीमध्ये या शब्दाचा उपयोग आपल्या प्रिय व्यक्तीसाठी केला जातो.

व्यवसायाने सेल्सवुमन असलेली मिशेल जेव्हा तिला वाटते, तेव्हा ती या बोईंग विमानाला पाहायला जाते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मिशेलने या विमानाच्या पंखांचे चुंबन घेताना काही छायाचित्रेही घेतली होती. विमानाचे वेगवेगळे भाग गोळा करणे हा मिशेलचा छंद आहे. एकदिवशी विमानासाठी मेकॅनिक होणे हे तिचे स्वप्न आहे. आपल्या प्रिय विमानाची सारखी आठवण येत असल्याने, मिशेलने विमानाचे एक खेळण्याचे मॉडेलही खरेदी केले आहे. हे मॉडेल ती नेहमी आपल्यासोबत बाळगते, त्याच्याबरोबर झोपते.

(हेही वाचा: टेकऑफ करताना तुटलं विमानाच चाक; पहा या घटनेचा थरारक व्हिडिओ)

याबाबत मिशेल म्हणते की, ‘आमच्या अनोख्या नात्यावर कुटुंबाने कधीही आक्षेप घेतला नाही. मात्र काही मित्रांनी हा एक विकार असल्याचे म्हटले, तसेच काहींनी हा एक आजार असल्याचे म्हटले. मात्र मला काहीच फरक पडला नाही’. एखादा निर्जीव वस्तूंच्या प्रेमात पडणे याला ऑब्जेक्टोफिलिया म्हणतात. याआधी मिशेल एका व्यक्तीच्या प्रेमात होती मात्र तिचे प्रेम यशस्वी ठरू शकले नाही. त्यानंतर आता ती या विमानाच्या प्रच्द्न प्रेमात असलेली दिसून येत आहे.