Girl Ate Snake Viral Video: तरुणीने कच्चा खाल्ला साप; यूजर्स म्हणाले, माणूस आहे की जनावर? (Watch Video)
परंतु, तुम्हाला माहित आहे का की जगात असे काही देश आहेत जिथे लोक या धोकादायक प्राण्याला त्यांच्या अन्नात समाविष्ट करतात. होय, चीन, व्हिएतनाम आणि दक्षिण कोरियासारख्या देशांमध्येही लोक साप खातात. सध्या असाचं एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुणी सापाला कच्चा खाताना दिसत आहे.
Girl Ate Snake Viral Video: सापांची (Snakes) गणना जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांमध्ये केली जाते. यातील काही सर्पचं विनाविषारी असतात. परंतु, यातील काही साप मात्र अतिशत विषारी असतात. साप केवळ लांबून पाहिला तरी लोक घाबरून ओरडू लागतात. परंतु, तुम्हाला माहित आहे का की जगात असे काही देश आहेत जिथे लोक या धोकादायक प्राण्याला त्यांच्या अन्नात समाविष्ट करतात. होय, चीन, व्हिएतनाम आणि दक्षिण कोरियासारख्या देशांमध्येही लोक साप खातात. सध्या असाचं एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुणी सापाला कच्चा खाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटीझन्सना धक्का बसला आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलीसमोर अनेक साप ठेवण्यात आले आहेत, जे मेलेले आहेत. तिच्यासमोर मिरच्या आणि चिरलेले टोमॅटो देखील ठेवले आहेत. दरम्यान, मुलगी एक साप हातात घेते आणि तो कच्चा खाऊ लागते. ती मोठ्या सहजतेने सापाचे मांस खाताना दिसते. कधी ती सापाच्या तोंडाजवळचे मांस दाताने फाडून चावताना दिसते, तर कधी ती मधला भाग खाताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर तिला सापाचे मांस किती आवडते हे स्पष्ट दिसत आहे. हा व्हायरल व्हिडिओ दक्षिण कोरियाचा असल्याचे बोलले जात आहे. (हेही वाचा -Snake Viral Video: मोबाईल चार्जर तोंडात घेऊन बेडवर रेंगाळताना दिसला खतरनाक साप, व्हिडीओ पाहून व्हाल धक्क)
दरम्यान, असा दावा केला जात आहे की दक्षिण कोरियामध्ये एक टीव्ही शो आहे ज्यामध्ये लोक विचित्र पदार्थ खाताना दिसत आहेत. सापाचे मांस खात असलेल्या मुलीचा हा व्हिडिओ कदाचित याच शोचा भाग असेल. हा व्हिडिओ asmrmukbangworld नावाच्या आयडीसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 16 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
पहा व्हिडिओ -
तथापी, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, 'चायनीज आणि कोरियन काहीही खाऊ शकतात', तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, 'शिट... हे पाहून मला उलट्या होऊ लागल्या'. तसेच आणखी एका युजरने 'ही माणूस आहे की जनावर' असं म्हटलं आहे.