Uttar Pradesh Horror: उत्तर प्रदेशात माणुसकीला काळीमा फासणारी घटना; वृद्ध व्यक्तीच्या चेहऱ्याला शाई फासत गळ्यात चपलांचा हार घालून गावात काढण्यात आली धिंड; Watch Video

ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

UP Elderly Man Viral Video (PC - Twitter/@MasoudMudabbir)

Uttar Pradesh Horror: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका वृद्धाला (Elderly Man) शिक्षा करताना शालीनतेच्या सर्व मर्यादा मोडल्या गेल्या आहेत. एका भीषण घटनेत, उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगरमध्ये (Siddharthnagar) एका वृद्ध व्यक्तीचा चेहरा शाईने काळे करून त्याच्या गळ्यात चपलांचा हार घालण्यात आला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना शुक्रवारी संपूर्ण गावासमोर घडली. आरोपींनी या व्यक्तीला थुंकी चाटायला लावली. तसेच त्याला सिट-अप करायला लावले. मोहब्बत अली असे पीडित वृद्धाचे नाव आहे.

सिद्धार्थनगर जिल्ह्यातील गोल्हौरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तिघरा गावात ही घटना घडली. मोहब्बत अली गोल्हौरा पोलीस स्टेशन परिसरातील तिघरा गावचा रहिवासी आहे. गावातील महिलांशी बोलत असल्याचा आरोप करत मोहब्बत अलीला गावातील बदमाशांनी शिक्षा केल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा -Viral Video: महिलेचा धोबीपछाड! घरी उशिरा आल्याने पतीला चोपलं; व्हिडिओ व्हायरल)

या अमानुष शिक्षेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, म्हाताऱ्याला दोरीने बांधून संपूर्ण गावात परेड करण्यात येत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये बदमाश वृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण करताना दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये हे देखील दिसून येते की, वृद्ध व्यक्तीला जमिनीवर बसवले जाते आणि थुंकी चाटण्यास सांगितले जाते. म्हातारा माणूस जमिनीवर बसतो आणि थुंकतो मग स्वतःची लाळ बोटात घेऊन चाटतो. त्यानंतर वृद्ध व्यक्तीने पोलिस स्टेशन गाठले आणि बदमाशांच्या विरोधात एफआयआर नोंदवला. या तक्रारीवरून चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (हेही वाचा - Mumbai Youth Performs Risky Stunt On BEST Bus: मुंबईतील तरुणाचा वांद्र्यात बेस्ट बसमध्ये धोकादायक स्टंट, बसमागील कड्यावर उभा राहून केला प्रवास, पहा व्हिडिओ)

वृद्ध व्यक्तीने तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.