IPL Auction 2025 Live

The Great Khali Viral Video: द ग्रेट खली याचे हे व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिले आहेत का?

आपल्या धिप्पाड देहयष्टीमुळे तो ओळखला जातो. WWE चा आखाडा ते बॉलिवूड आणि आता विविध जाहीराती आणि व्हिडिओमध्येही त्याने आपला जलवा दाखवला आहे. अमेरिकेमध्ये चांगले करीअर सुरु असताना खली भारतात परतला. भारतात असे अनेक खली निर्माण करावे हे स्वप्न घेऊन तो भारतात परतला आहे.

The Great Khali Viral Video | (Photo-Instagram)

द ग्रेट खली (The Great Khali) हे नाव आता भारतात सर्वपरीचित झाले आहे. सहाजिकच द ग्रेट खली याच्यामुळे डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) हा मनोरंजनात्मक गेमही सर्वपरिचीत झाला. खली आता WWE मध्ये दिसत नसला तरी सोशल मीडियावर मात्र तो नेहमीच कार्यरत असतो. सोशल मीडियातून आपले फोटो, व्हिडिओ खली सोशल मीडियातून शेअर करत असतात. त्यातील अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. आताही खली याचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यातले काही व्हिडिओ, फोटो जुने असले तरीही सोशल मीडियावर व्हायरल होतात हे विशेष. आताही खली याचा एक शिवनयंत्र चालवणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

द ग्रेट खली (The Great Khali) याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत खली सिलाई मशीन चालवताना दिसतो आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 16 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओखाली युजर्सकडून विविध प्रतिक्रियाही येत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, सर माझा कुर्ता पायजम्याची ऑर्डर घ्या, दुसरा म्हणतो की, सर आपल्यात टॅलेंट ठासून भरले आहे. आणखी एका युजर्सने म्हटले की सर मशीन तडकून जाईल. याही पेक्षा काही हटके प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत. (हेही वाचा, WWE SmackDown: 'डब्ल्यूडब्ल्यूई स्मैकडाउन' बाबत तुम्हाला या गोष्टी माहित आहेत का?)

इन्स्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by The Great Khali (@thegreatkhali)

इन्स्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by The Great Khali (@thegreatkhali)

द ग्रेट खली (The Great Khali) याचे खरे नाव दिलीप सिंह राणा असे आहे. आपल्या धिप्पाड देहयष्टीमुळे तो ओळखला जातो. WWE चा आखाडा ते बॉलिवूड आणि आता विविध जाहीराती आणि व्हिडिओमध्येही त्याने आपला जलवा दाखवला आहे. अमेरिकेमध्ये चांगले करीअर सुरु असताना खली भारतात परतला. भारतात असे अनेक खली निर्माण करावे हे स्वप्न घेऊन तो भारतात परतला आहे. आता पर्यंत त्याचे एकदोन चित्रपटही प्रदर्शित झाले आहेत.